Nashik News: नाशकातील अनधिकृत दर्गा हटवला, शिबिरात संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, शिबिरात अडथळ्यासाठी दर्ग्यावर बुलडोझर? VIDEO

Dargah Demolition: नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावरुन कारवाई केली आणि नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र या कारवाईच्या दिवसावरुन नवा वाद पेटलाय.. हा वाद नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
sanjay raut
sanjay rautsaam tv
Published On

ही दृश्य पाहा...पोलिसांच्या बंदूकीतून या गोळ्या आणि अश्रुधूराचे नळकांड्या ही दृश्य आहेत नाशिकच्या काठेगल्लीतील.... याच काठेगल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्यावर महापालिकेनी भल्या पहाटे बुलडोझर चालवला. मात्र त्यापुर्वीच नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती..मात्र दंगेखोरांनी थेट पोलिसांवरच दगडफेक केलीय.. तर पोलिसांनीही 15 दंगेखोरांच्या मुसक्या आवळल्यात...

नाशकात ठाकरे गटाच्या शिबिराच्या दिवशीच दर्ग्यावर कारवाई करण्यात आली... मात्र या कारवाईच्या हेतूवरच राऊतांनी सवाल उपस्थित केलाय...

22 फेब्रुवारीला नाशिकमधील अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.. त्यावेळी दोन गट आमने-सामने आल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती... मात्र त्यानंतर मौलवींशी झालेल्या बैठकीत दर्गा हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली...मात्र ठाकरेंच्या विभागीय शिबिराच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जातोय... मात्र शिंदे गटाने हा दावा फेटाळून लावलाय...

sanjay raut
Maharashtra Politics: भाजपच्या या आमदाराला अजित पवार नकोसे|VIDEO

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणं गरजेचंच आहे.. मात्र अशा घटनातून गोंधळ आणि धार्मिक तणाव निर्माण होणार नाही? याची काळजी सरकारने घ्यायला हवी.. अन्यथा धार्मिक तेढ आणि विरोधकांच्या सभा उधळण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याच्या चर्चा होत राहतील...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com