तरबेज शेख -
नाशिक: नाशिक परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या बंगल्यात घुसून थेट चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या सराईत चोरट्याला नाशिक गुन्हेशाखेच्या युनिट एकने जालन्यातून पकडले आहे. जावेद पठाण असे अटक केलेले आरोपीचे नाव असून त्याने नाशिकमध्ये चंदन चोरीचे 5 गुन्हे घडवून आणल्याचं उघड झालं आहे (Nashik Sandalwood Thief Arrested By Police Who Theft Sandalwood From IG Bungalow).
नाशिकच्या (Nashik) गडकरी चौकात असलेल्या आयजी यांच्या बांगल्यातून 16 फेब्रुवारीला चंदन झाडाची चोरी (Sandalwood thief) करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे . जावेद पठाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या सराईताला पकडून आणताना त्याच्या नातलगांसह नागरिकांनी त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करुन पोलीस कारवाईला विरोध करत गोंधळ घातल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, पथकाने जीव धोक्यात घालून त्याला ताब्यात घेत नाशिकला आणले आहे.
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना नाशिकमध्ये चंदनचोरी करणारे चोरटे जालन्यातील कठोरा बाजार भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथक नियोजनानुसार जालन्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि या संशयिताला पकडण्यात पथकाला यश मिळाले आहे.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गडकरी चौकातील गोदावरी बंगल्याच्या आवारातून 12 हजार रुपयांचे चंदनाचे झाड तोडून चोरुन नेले. या बंगल्यावरील सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड चोरुन नेल्याचे समोर आले होते. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. तर सातपूर येथील शासकीय आयटीआय जवळील पोस्ट कार्यालयाच्या आवारातूनही चोरट्याने चंदनाचे झाड चोरुन नेले होते.
पोलीस (Police) ठाण्यांकडून तपास सुरु असताना युनिट एककडून समांतर तपास सुरु असताना त्यांना चंदनचोर जालन्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कठोरा बाजार भागात सापळा रचला. जावेद पठाण या संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 5 गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलीस साथीदारांच्या शोधात आहे.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.