नाशिक: नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावर पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. पण त्यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेकडो नागरिक काठे गल्ली परिसरात दाखल झाले होते. आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून अनेकांना ताब्यात घेण्यात आले.
नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळाच्या वादातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासूनच नाशिक-पुणे महामार्गावर काठे गल्ली ते द्वारकाच्या आसपासच्या सर्व परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.
शनिवारी सकाळीच काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची प्रक्रिया नाशिक महापालिका प्रशासनाने सुरू केली. सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाईचा निर्णय घेतला. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात तैणात करण्यात आला होता. काठे गल्ली ते द्वारका परिसरला छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
धार्मिक स्थळ हटवण्याच्या कामाला सुरुवात
सकल हिंदू समाजाने अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलत कारवाईला सुरुवात केली. २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे.
मुस्लिम धर्मगुरू घटनास्थळी दाखल
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहर-ए-खतीब हाफिज हिसामोद्दीन, माजी नगरसेवक बबलू पठाण, मौलाना इब्राहिम कोकणी आदी मुस्लिम धर्मगुरू घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांना धार्मिक स्थळाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला.
महंत सुधीरदास आणि अनिकेत शास्त्री काठे गल्ली परिसरात दाखल
धार्मिक स्थळी प्रवेश मिळावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास दास यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले . जोपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री होत नाही, तो पर्यंत आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्याशिवाय महंत अनिकेत शास्त्री महाराज यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय. त्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.तसेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे देखील काठे गल्ली चौकात दाखल झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.