ललित पाटील प्रकरण (Lalit Patil) अन् नाशिकमधील उघडकीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरुन ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाच्या नेत्यांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) नाशिकमध्ये ठाकरे गटाने ड्रग्ज रॅकेट विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिकमधील (Nashik) ड्रग्जरॅकेट विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. उडता पंजाबप्रमाणे उडता नाशिक होऊ नये, नाशिकचे नागपूर होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी सरकावर जोरदार हल्ला चढवला.
"ड्रग्जरॅकेट विरोधात निघालेला हा महाविराट मोर्चा आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रक काढत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हायचे नाही, असे फर्मान काढले. मात्र हा विद्यार्थ्यांसाठीच मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले. तसेच शिक्षण खात्याला यांचे हप्ते मिळतात का? शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा," अशी मागणीही राऊतांनी यावेळी केली.
"या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत जायचे आहे, नाशिक वाचवायचे आहे, असे म्हणत शहरात ड्रग्जचा कोट्यवधींचा व्यापार सुरू आहे. तरुण पिढी उध्वस्त होताना पाहणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच या सर्वांना रामकुंडात बुडवा, नाहीतर तुडवा.." असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
शिवसैनिकांना धमक्या देवू नका....
आपल्या भाषणात फडणवीसांवरही (Devenra fadanvis) संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. "देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलावं. अंगावर आला तर शिंगावर घेवू.. काय करणार आहात? जेलमध्ये टाकाल का? एकदा तुरूंगात गेलो परत जाईल, शिवसैनिकांना धमक्या देवू नका," असा इशारा त्यांनी दिला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.