Nashik: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण; फडणवीसांनी वाचला कामाचा पाढा

आंबेडकरांच्या स्मारकासाठी मुंबईत सुई टोकाएवढीही जागा तत्कालीन सरकारनं दिली नाही.
 Devendra fadnavis
Devendra fadnavis Saam Tv
Published On

नाशिक: नाशिकमध्ये आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण झाले. पाथर्डी फाटा परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण फडणवीस यांनी केले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे शहरातील आमदार आणि नेते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोलतना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की मी अत्यंत नशीबवान आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (DR. Babasaheb Ambedkar) सेवा करण्याची संधी मला वारंवार मिळाली. आंबेडकरांच्या स्मारकासाठी मुंबईत सुई टोकाएवढीही जागा तत्कालीन सरकारनं दिली नाही.

 Devendra fadnavis
जयंत पाटलांच्या कृपेने तटकरे दिल्लीत; माजी आमदारांचं भाकीत

मात्र आम्ही इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली, इंदू मिलच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं, आज त्याचं काम सुरु आहे. नागपूरचा महापौर असतांना दीक्षाभूमीवर देखील सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. मुख्यमंत्री झाल्यावर 100 कोटींचा निधी दिला. लंडनमधील लिलावात काढलेलं आंबेडकराचं घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं. त्याआधी 2 वर्षे तत्कालीन सरकारकडे आंबेडकर अनुयायी लिलाव होऊ देऊ नका, अशी मागणी करत होते.

मात्र सरकारनं एक पैसा दिला नाही अशी टीका फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवरती केली आहे. जेव्हा आमच्यासमोर अडचण येते, तेव्हा आम्हाला कुठेही जायची गरज भासत नाही. कारण आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात सर्व उत्तरं मिळतात. आंबेडकरांनी देशावर केलेले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. समता आणि ममता युक्त समाज हेच छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचं ध्येय होतं असेही फडणवीस या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com