Onion : मे महिना संपण्यावर तरी कांदा खरेदीला मुहूर्त मिळेना; नाफेड आणि NCCF कडून गलथान कारभार पुन्हा समोर

Nashik News : फेड आणि NCCF कडून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्टं ठेवण्यात आले आहे. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात केली जाणार आहे प्रत्येकी १ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदीचे उद्दिष्ट
Onion
Onion Saam tv
Published On

नाशिक : नाफेड आणि NCCF कडून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात येत असतो. या अनुषंगाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कांदा खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र मे महिना संपण्यावर आला असताना देखील अद्याप कांदा खरेदीला मुहूर्त सापडत नसल्याचे पाह्ण्यास मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा नाफेड आणि एनसीसीएसचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला चांगला भाव मिळावा; यासाठी नाफेड व एनसीसीएस कडून कांदा खरेदी करण्यात येत असतो. मात्र यंदाच्या वर्षातील कांदा खरेदी अद्याप सुरु करण्यात आली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुळात एप्रिल महिन्याच्या शेवटी कांदा काढणीला सुरवात झाली होती. तेव्हा पासून कांदा खरेदी सुरु होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप खरेदीला सुरवात झालेली नसल्याने नाफेड आणि NCCF च्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. 

Onion
Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर; जालना, रायगडमध्ये येलो अलर्ट, वीज पडून दोघांचा मृत्यू

तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट  
यंदा नाफेड आणि NCCF कडून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्टं ठेवण्यात आले आहे. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात केली जाणार आहे प्रत्येकी १ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदीचे उद्दिष्ट आहे. या १ लाख मेट्रिक टन कांद्यापैकी NCCF कडून एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ४५ टक्के तर जून महिन्यात उर्वरित ४५ टक्के कांदा खरेदीचं उद्दिष्टं आहे. त्या अनुषंगाने २८ एप्रिलला निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रिया संपून देखील अद्याप कांदा खरेदीला सुरुवात झालेली नाही.

Onion
Nandurbar : सोलर प्लेटच्या आडून अमली पदार्थ तस्करी; नंदुरबारमध्ये लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त; चालकाला अटक

वातावरणामुळे शेतकरी हवालदिल 

मे महिना संपत आला, तरी अद्याप नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदीला सुरुवात नाही. मागील वर्षी नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या नंतर यंदा तरी दोन्ही संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणेची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कांदा खरेदीलाच सुरवात झालेली नाही. एकीकडे कांद्याच्या भावात झालेली घसरण तर दुसरीकडे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे लवकरात लवकर कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांची आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com