Nashik Accident News : वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; २ तरुणींसह एकाचा जागीच मृत्यू, हृदयद्रावक घटना

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी-सापुतारा मार्गावर मंगळवारी सायंकाळ्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला.
Nashik Accident News
Nashik Accident NewsSaam TV

Nashik Accident News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. भरधाव वेग व वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अधिकांश अपघातामागील कारण असते. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी-सापुतारा मार्गावर मंगळवारी सायंकाळ्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Nashik Accident News
Bus Accident : यमुना एक्सप्रेस वेवर बसला भीषण अपघात; ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २२ जखमी

समवयस्क तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अंजली राकेश सिंग, नोमान चौधरी व सृष्टी नरेश भगत अशी मृतांची नावे आहेत. तर अजय गौतम हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून सापुताराकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, चार मित्र एका कारने वणीहून सापुताराकडे जात होते. त्यांची कार चौसाळे फाट्याच्यापुढे आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Nashik Accident News
Rashichakra : या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; तुमची रास तर यात नाही ना?

दरम्यान, अपघाताची  (Accident) माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमीला तातडीने उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक-वणी-सापुतारा या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. हा मार्ग गुजरातला जोडला असल्याने दिवसभर कुठे ना कुठे अपघाताची घटना घडत असतात. त्यामुळे वाहनचालकांनी निष्काळजीपणाने वाहन चालवू नये, तसेच आपल्या वाहनाचा वेग कमी ठेवावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com