नाशिक : मकरसंक्रांती जवळ येत असून पतंग उडविण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारात बंदी असलेला मांजा विक्रीसाठी आणला जात आहे. विक्री करणाऱ्यांवर अनेकदा कारवाया झाल्यानंतर देखील अगदी सर्रासपणे मांजा विक्री केला जात आहे. अशांविरोधात नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून अनधिकृत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तब्बल १४ जणांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील पतंगोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी धोकेदायक असलेला मांजाचा वापर केला जात आहे. मांजामुळे दरवर्षी अनेकजण जखमी होतात. तर काहींना यामुळे जीव गमवावा लागत असतो. यामुळे या मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी देखील अवैधरित्या सर्रासपणे मांजाची विक्री व वापर देखील होत असल्याचे पाहण्यास मिळते. अशांवर कारवाई करण्यात येत आहे.
१४ जणांवर तडीपारीची कारवाई
अवघ्या पंधरा दिवसांवर मकरसंक्रांती आली आहे. यामुळे आकाशात पतंग उडताना दिसू लागले आहेत. मात्र नाशिक शहरात बंदी असलेला मांजा विक्री अवैधपणे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. या विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत तब्बल २२ गुन्हे दाखल करत १४ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
तर मोक्का अंतर्गत कारवाई
नायलॉन मांजा वापरामुळे अनेक जण जखमी होत आहेत. यामुळे नागरिकांनी देखील पतंग उडवतांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनि केले आहे. यानुसार काही जणांवर कारवाई झाली आहे. तरी देखील मांजा विक्री किंवा वापर करताना आढळून आल्यास वेळ पडली तर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.