Police Action on Bullet Raja: हौशी बुलेट राजांनो सावधान! नाशिक पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका; तब्बल १३ बुलेट जप्त

Nashik Police News: त्या बुलेट तपासणीसाठी आरटीओकडे पाठविल्या जाणार असून, प्रत्येक बुलेट मालकास २० ते २५ हजार रुपये दंड आकारला आहे.
Nashik Police News
Nashik Police NewsSaamtv
Published On

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik News: पोलिसांकडून वाहनधारकांना सातत्यानं नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृतीचा मार्ग देखील पोलिसांकडून वापरण्यात येतो. प्रबोधन, जनजागृती करुन देखील जे लोक नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्यावर मग पोलीस कारवाईचा बडगा उगारतात.

मात्र तरीही तरुणाईमध्ये बुलेटला कर्णकर्कश हॉर्न लावून गाड्या पळवण्याची मोठी क्रेझ सध्या पाहायला मिळते. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. अशाच १३ बुलेटचालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून पोलिसांनी १३ बुलेट जप्त केल्या आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik) शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास नाशिककरांना होत आहे. याप्रकरणी काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. याच तक्रारीवरुन बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणार्‍या कॉलेजरोड रोडवर फिरणार्‍या १३ बुलेटचालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १३ बुलेट जप्त केल्या आहे. त्या बुलेट तपासणीसाठी आरटीओकडे (RTO) पाठविल्या जाणार असून, प्रत्येक बुलेट मालकास २० ते २५ हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे मॉडिफाइड सायलन्सर करणार्‍या बुलेट मालकांचे धाबे दणाणले आहेत.

Nashik Police News
Ratnagiri News : 'आंदाेलनात खारघरची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यावी' (पाहा व्हिडिओ)

दरम्यान, मोटार वाहन कायद्यानुसार गंगापूर पोलिसांनी बुलेटमालकांना नोटीस दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आवाज करणाऱ्या सायलेन्सर लावू नका असे आवाहन केले आहे. नाहीतर यापुढे गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितलं आहे.

Nashik Police News
Shivani Wadettiwar on V D Savarkar: विजय वडेट्टीवार यांच्या लेकीने सावरकरांबद्दल केलं मोठं वक्तव्य, राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com