Dengue : नाशिकमध्ये पुन्हा डेंग्यूचा डंख; वीस दिवसात आढळले १०७ रुग्ण

Nashik News : पावसाळ्यात पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमध्ये दास निर्मिती होऊन डेंग्यू, मलेरिया सारख्या साथरोगांचा फैलाव होत असतो. मागील वर्षीच्या पावसाळ्यात नाशिक शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते
Dengue
DengueSaam tv
Published On

नाशिक : डेंग्यू, मलेरिया या सारख्या साथरोगांचा फैलाव प्रामुख्याने पावसाळ्यात अधिक प्रमाणात होत असतो. नाशिकमध्ये मात्र भर उन्हाळ्यात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून मागील २० दिवसात शहरातील वेगवेगळ्या भागात मिळून १०७ रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकजण तापाने फणफणले आहेत. यामुळे नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. 

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या उन्हात डासांची उत्पत्ती खूप कमी प्रमाणात होत असते. अर्थात डासांचा अंडी घालण्यास डबके साचलेले नसल्याने डेंग्यूचे डास उत्पन्न होत नाहीत. पावसाळ्यात पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमध्ये दास निर्मिती होऊन डेंग्यू, मलेरिया या सारख्या साथरोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असतो. मागील वर्षीच्या पावसाळ्यात नाशिक शहरात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. तर आता पुन्हा शहरात डेंग्यूचा फैलाव होण्यास सुरवात झाली आहे. 

Dengue
Vitthal Rukmini Mandir : विठुरायाच्या महानैवेद्यात आजपासून आमरस; भाविकांनाही दिला जाणार आमरसाचा प्रसाद

१०७ रुग्ण आढळले 

नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात पुन्हा डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मागील २० दिवसांत डेंग्यूच्या १०७ रुग्णांची नोंद झाली असून हे रुग्ण महापालिकेचे रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्या देखील मोठी असून डेंग्यू सदृश्य रुग्ण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Dengue
Marriage : असाही आदर्श विवाह; लग्नाचा खर्च टाळून बांधले शिवार रस्ते, साध्या पद्धतीने केला विवाह

आरोग्य विभाग अलर्ट 

दरम्यान नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात मागील १५ ते २० दिवसात तापसदृश्य आजाराच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाली आहे. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, त्या भागात आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण करत उपाययोजना करण्यात येत आहेत. तर सध्या वापर होत असलेल्या कुलर आणि फिजच्या ट्रे मध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी फ्रिज आणि कुलरच्या ट्रे मध्ये साचलेले पाणी त्वरित स्वच्छ करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com