अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्हा व परिसरात आज दिवसभरापासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. (Nashik) नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने गोदावरी नदीला (Godavari River) देखील पूर आला असून यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पूर आहे. शिवाय नाशिकच्या चणकापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
नाशिकच्या चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला धरणाच्या ७ दरवाजामधून ३३ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने (Girna River) गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गिरणा नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर चणकापूर धारणाखालील अंठबे पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने कळवण, वणीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीपात्रा लगतच्या नागरिकांना सातर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.
चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या (Rain) पावसामुळे दुष्काळाने होरपळेल्या बळीराजा पावसाने सुखावला आहे. चांदवड तालूक्यातील पश्चिम रट्ट्यातील वडनेर- भैरव, धोडंबे, हट्टी, पारेगाव, वडाळीभोई या गावांत मुसळधार पाऊस झाल्याने विनिती व पाराशर नद्यांना पूर आला आहे. काही दिवसांपुर्वी कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांच्या पात्रातून पूर वाहत असल्याने बळीराजा आनंदीत झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.