Manmad Accident : भीषण अपघात..भरधाव ट्रकने शाळकरी मुलांना चिरडले; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Nashik Manmad News : सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. मनमाड बाजार समितीच्या समोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे यांना धडक
Manmad Accident
Manmad AccidentSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शाळेतून घरी परतत असताना भरधाव ट्रकने शाळेतील दोन मुलांना चिरडले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका मुलीचा व मुलाचा समावेश आहे. सदरची घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लागलीच धाव घेत गर्दी केली होती. 

मनमाड- चांदवड रोड वर सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून यात घटनेत वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. सकाळी दोघेजण शाळेत गेले होते. सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे यांना धडक दिली. 

Manmad Accident
Jalgaon Accident : बसची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

काही अंतरापर्यंत फरफटत नेले 

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यानंतर दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक भरधाव वेगात असल्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.  

Manmad Accident
Shivendraraje Bhosale : मविआला फटका बसल्याने लाडकी बहीण योजना बदनाम; शिवेंद्रराजे भोसलेंची शशिकांत शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया

ट्रक चालक ताब्यात 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात नेले. दरम्यान अपघातानंतर ट्रक पुढे जाऊन नागरिकांनी अडविला. यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com