
नाशिक: नाशकात विना हेल्मेट दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीये. गुरुवारपासून नाशिक शहरात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात आलीये. या अभियानाच्या पहिल्याचं दिवशी नाशिक पोलिसांनी 452 दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे (Nashik helmet drive police fined 452 people for not wearing helmet).
नाशकातील एकूण 12 पॉईंट्सवर पोलिसांकडून विनाहेल्मेट (Without Helmet) दुचाकीचालकांची धरपकड करण्यात आली. पहिल्याचं दिवशी पोलिसांनीविना हेल्मेट दुचाकीचालकांकडून 2 लाख 24 हजारांचा दंड (Fine) वसूल केला आहे. हेल्मेट वापराबाबत वारंवार आवाहन करूनही हेल्मेट (Helmet) वापराबाबत उदासीन असलेल्या नाशिककरांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
नाशकात हेल्मेटसक्तीची कडक अंमबजावणी करत विना हेल्मेट दुचाकी चालकाला प्रथम 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल. तर दुसऱ्यावेळी 1 हजार रुपये दंडासह 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार आहे. गेल्या 15 ऑगस्टपासून नाशिक (Nashik) शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम (Helmet Drive) सुरु आहे. पहिल्या टप्प्यात नो हेल्मेट, नो पेट्रोल (No Helmet No Petrol), दुसऱ्या टप्प्यात विना हेल्मेट दुचाकी (Bike) चालकांचं समुपदेशन आणि परीक्षा, तर तिसऱ्या टप्प्यात नो हेल्मेट, नो एन्ट्री मोहिमेनंतर आता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
Edited By - Nupur Uppal
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.