Nashik Fire: नाशिकमध्ये काचा तयार करणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Nashik sinnar Fire news in Marathi: नाशिकमधील माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
nashik fire
nashik fire Saam tv

Nashik Sinnar Fire Update:

नाशिकमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. नाशिकमधील माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या कंपनीत काचा तयार केल्या जातात. कंपनीत स्फोट झाल्यानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील माळेगाव एमआयडीसीतील काचा तयार करणाऱ्या हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला आहे. कंपनीत कामगार अडकले की नाहीत याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र कंपनीत आगीचे प्रचंड लोळ परिसरात पसरले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

nashik fire
Nashik Crime News: 'मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, त्या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घ्या, तोतया अधिकाऱ्याचा प्रशासकांना फोन

आगीची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सिन्नर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

nashik fire
Nashik Crime News: पैसे कमवण्यासाठी चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल; तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही चक्रावले

घटनास्थळी काय परिस्थिती होती?

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बॉयलरला उशिरा आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे घटनास्थळी सर्वत्र काळा धूर पसरला. कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाना पाणी टंचाईला सामोरे जावं लागलं आहे.

कारखान्यातील पाणी उपसणारा पंप वेळेवर सुरु झाला नाही. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी आल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर निमाचे स्थानिक पदाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. भट्टीत स्फोट होण्याआधी सर्व कामगार बाहेर पळाल्याने ते बचावले, असं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com