Nashik News : राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक घटनेनं खळबळ

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर अज्ञातांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे.
NCP Prachi Pawar Attack
NCP Prachi Pawar Attack Saam TV
Published On

NCP Prachi Pawar Attack : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर अज्ञातांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी (13 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

NCP Prachi Pawar Attack
Santosh Munde Death : प्रसिद्ध Tik Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

डॉ. प्राची पवार ह्या मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार या मंगळवारी रात्री गोवर्धन शिवारात असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या. यावेळी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले होते.

प्राची पवार या दुचाकीवरून फार्म हाऊसजवळ (Nashik) आल्या असता, त्यांनी या दोघांना हटकलं. तेव्हा, हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने प्राची यांच्या हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे.

NCP Prachi Pawar Attack
IND vs China : लाकडी काठ्या, बांबू आणि ६०० चिनी सैनिक; भारतीय जवानांनी कसं रोखलं VIDEO आला समोर

दरम्यान, प्राची पवार यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्ला कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप सांगितलेलं नाही. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com