Nagpur: उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले; पोलिसांपुढे आव्हान

नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीच्या दुपटीने वाढ
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

नागपूर - उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात (Nagpur) अंमली पदार्थांच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंमली पदार्थांच्या तस्करीत दुपटीने वाढ झाली आहे. तरुणाईला गांजा, एम.डी. यासारख्या ड्रग्ज चा विळखा पडत आहे. त्यामुळं या तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

नागपुरात तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी चालली आहे. ड्रग्ज पेडलर शहरात गांजा, चरस, ब्राऊन शुगर, एम.डी. यासारख्या ड्रग्ज ची तस्करी करून तरुणांमध्ये त्याचा प्रसार करण्याचं काम करत आहे. या तस्करीसाठी महाविद्यालयीन तरुणांचा उपयोग केला जात असल्याची माहिती आहे.

हे देखील पाहा -

गेल्या वर्षी 299 किलो गांजा आणि 572 ग्राम एम. डी. पोलिसांनी जप्त केला होता. याची किंमत जवळपास साडेतीन कोटी रुपये होती. तर यावर्षी 1 जानेवारी 31 जुलै पर्यंत 357 किलो गांजा आणि 429 ग्राम एम.डी. पोलिसांना जप्त केला आहे. अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे, हे पोलीस आयुक्त मान्य करतात, मात्र, आम्ही कारवाया वाढविल्यामुळं प्रकरणं उघडकीस येत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

Nagpur News
अंबरनाथमध्ये एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली; २ जण गंभीर जखमी

नागपूर पोलिसांनी गेल्या वर्षी तस्करीचे 75 गुन्हे उघडकीस आणले असून यात 104 आरोपींना अटक केली होती. तर या वर्षी सात महिन्यात तस्करीचे 47 गुन्हे उघडकीस आणत 73 आरोपींना अटक केली. यावरून शहरात अंमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचं दिसून येतं. त्यामुळं या ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळून तरुणाईला यापासून मुक्त करण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com