अंबरनाथमध्ये एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली; २ जण गंभीर जखमी

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली
Ambernath News
Ambernath NewsSaam Tv

आंबेरनाथ - काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) जमीन खचून एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली. या घटनेत घरातील ३ जण जखमी झाले असून यापैकी दोघांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे.

अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील आंबेडकर नगर भागात ही भिंत कोसळण्याची घटना घडली. या परिसरात काही घर टेकडीवर असून काही घर खालच्या भागात आहेत. काल रात्रभर या भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळं टेकडी परिसराची जमीन काहीशी खचली आणि टेकडीवर असलेल्या एका घराची भिंत खालच्या भागात राहणाऱ्या दिलीप सुरवाडे यांच्या घरावर कोसळली.

हे देखील पाहा -

ही घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दिलीप सुरवाडे हे कामावर जायला निघाले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेले होते. अचानक घराच्या पत्र्यावर भिंत कोसळल्यानं पत्रे, अँगल आणि भिंतीचा ढिगारा या सर्वांच्या अंगावर पडला. त्यामुळे दिलीप सुरवाडे आणि त्यांची पत्नी बेबी सुरवाडे या दोघांना डोक्याला गंभीर इजा झाली. तर मुलगा मंगेश सुरवाडे याला किरकोळ इजा झाली.

Ambernath News
Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी केला इतका व्यवसाय

या घटनेनंतर स्थानिकांनी या सर्वांना बाहेर काढत अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात नेलंमात्र तिथे प्राथमिक उपचार करून या सर्वांना घरी सोडून देण्यात आलं. या घटनेनंतर आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com