मी आज फार आनंदित झालाेय : नारायण राणे

Narayan Rane
Narayan Rane
Published On

वेंगुर्ला : आज तुम्ही सर्वजण एकत्रित आलात याचा मला फार आनंद झाला आहे. नांदा साैख्य भरे असे मी म्हणेन. हाे, जिल्ह्याच्या विकासाठी सर्वांनी एकत्र या. अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकमुखाने विकासासाठी एकत्र व्हा अशी भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी व्यक्त केली. (narayan-rane-inagurated-vengurla-fish-market-devendra-fadnvis-kokan-news)

वेंगुर्ल्यातील जुन्या मच्छी मार्केटच्या ठिकाणी नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली आग्रही मागणी व गरजांच्या विचार करून नवीन सुसज्ज सागररत्न मत्स्य बाजारपेठ साकारण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज (रविवार) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आॅनलाईन पद्धतीने झाला. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आॅनलाईनच्या माध्यमातून जाेडले हाेते. खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, दीपक केसरकर हे सर्व नेते एकत्रित व्यासपीठावर उपस्थित हाेते.

राणे म्हणाले निसर्गरम्य असा सिंधूदूर्ग जिल्हा. त्यात अतिनिसर्गरम्य असा वेंगुर्ला जिल्हा. हा पर्यटन जिल्हा व्हावा. देश विदेशातील पर्यटक यावेत. येते पाच सहा दिवस पर्यटक राहावेत. त्यांच्या माध्यमातून अर्थकारण चालावे. हा जिल्हा आर्थिक समृद्धी व्हावा यासाठी प्रयत्नशिल राहिलाे. सागररत्न मत्स्य बाजारपेठ ही पालिकेच्या माध्यमातून उभी राहणारी ही एक सुविधा निर्माण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात काेणतीही याेजना राबविताना ना पक्ष पाहिला नाही, ना जात पाहिली, ना धर्म पाहिला. जनतेसाठी सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे अशी त्यांची भावना आहे. आमची आजही हीच अपेक्षा आहे. आमचं विमानतळ पुर्ण करा. सन 2014 दरम्यान आम्ही बांधण्यास घेतले. ते पुर्ण करा असेही राणेंनी महाविकास आघाडीतील काेणाचेही नाव न घेता टाेला हाणला.

Narayan Rane
नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?

आज तुम्ही सर्वजण एकत्रित आलात याचा मला फार आनंद झाला आहे. नांदा साैख्य भरे असे मी म्हणेन. हाे, जिल्ह्याच्या विकासाठी सर्वांनी एकत्र या. अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकमुखाने विकासासाठी एकत्र व्हा अशी भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com