राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे

पत्रकारांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये प्रामाणिक पत्रकारिता करावी; असा सल्लाही राणेंनी दिला.
राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे
राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे SaamTvNews

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात अनेक गँग आहेत. 'डी' नाही तर 'बी' आणि 'सी' गॅंग सुद्धा आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर सर्वांचा नंबर लागणार आहे, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना (Shivsena) संपवण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपल्या दोन्ही घरांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा :

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी यावेळी बोलताना राज्य सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. नवाब मलिक हे काय बोलत होते, आता त्यांची बोलती बंद झाली असेल. आम्ही हे अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होतं नवाब मलिक यांचेच संबंध नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळात डी, बी आणि 'सी' सगळ्या गँगची माणसे आहेत. आता क्रमाने एक एक आत जाणार असल्याचा दावा राणेंनी केलाय. नवाब मलिक यांच्यानंतर नंबर कोणाचा नंबर आहे असे विचारले असता तुम्हाला लवकरच अटक झाल्यानंतर कळेल असे ते यावेळी म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे
बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे पालन करण्याची गरज : गृहमंत्री

तर, नवाब मलिक यांच अनुकरण आपल्या जिल्ह्यातील कोणी करू नये असे म्हणत त्यांनी जिल्ह्यातील आपल्या राजकीय विरोधकांना थेट इशारा दिला आहे. नवाब मलिक काय बोलत होते, आता ईडी (ED) समोर त्यांनी बोलावे असेही राणे यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. सर्व अभ्यासकांचे देखील तेच मत आहे. संजय राऊत हे शिवसेना संपविण्यासाठी हे सगळं करत आगेत अशी टीका देखील राऊत यांच्यावर राणे यांनी यावेळी केली.

राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे
Nagpur : मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या!

संजय राऊत सकाळी उठल्यापासून बेजबाबदारपणे बोलतात आणि त्यांच्या बेजबाबदार बोलण्यावर आम्ही काय उत्तर द्यावं त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. असे म्हणताना हे शेवटचे वाक्य ब्रेकिंग न्यूज करा असेही त्यांनी पत्रकारांना सुचविले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, आम्ही काही तिची बेइज्जती केलेली नाही. तिला ज्याप्रकारे मारण्यात आले अत्याचार करून, ते आम्हाला योग्य वाटत नाही आणि ज्यांनी मारलं आणि ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा व्हावी ही केस दाबण्यात येऊ नये म्हणून आम्ही बोलतोय.

राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे
Nagpur : कुख्यात गुंड शोएब सलीम खानकडून कारागृह अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला!

आता तिच्या आई-वडिलांना कोण प्रवृत्त करतोय हे देखील आम्हाला माहित आहे आणि दिशाच जे झालं त्यावेळी तिच्या आई-वडिलांची भूमिका काय होती हे देखील मला चांगलं माहीत आहे. याची माहिती तुम्हीही घ्या आणि नंतर विचारा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. राणेंचा बंगला तोडण्याची हिंमत कोणात नाही आता ते तक्रारी करत आहेत. बंगल्यावर सुरु असणाऱ्या कारवाई बाबत राणे म्हणाले, माझं बांधकाम काही बेकायदेशीर नाही. मी सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. मुंबईच्या (Mumbai) बंगल्याला सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच मी 2013 सालात त्या ठिकाणी राहायला गेलो आहे. मालवणचे घर देखील सर्व परवानगी घेऊनच बांधलेले आहे.

राज्य मंत्रिमंडळात अनेक गॅंग, मलिक यांच्यानंतर सर्वांचे नंबर लागणार - राणे
पहा Video : शिवजयंती मिरवणूक अडवल्याने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांसोबत बाचाबाची

या घराबाबत कोणतीही नोटीस आम्हाला अद्यापही मिळालेली नाही तरीदेखील ज्या ज्या वृत्तपत्राने आणि वृत्तवाहिन्यांनी या घराच्या बाबतीत बातम्या दाखवल्यात त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार कोणालाही सोडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पत्रकारांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये प्रामाणिक पत्रकारिता करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com