विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला, राणे समर्थकांवर आरोप

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यभर अभूतपूर्व चांगला मोठा महा‘राडा’ झाला आहे.
विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला, राणे समर्थकांवर आरोप
विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला, राणे समर्थकांवर आरोपSaam Tv
Published On

सिंधुदुर्ग : केंद्रीयमंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यभर अभूतपूर्व चांगला मोठा महा‘राडा’ झाला आहे. एकीकडे शिवसेना Shivsena- BJP भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले, असताना राज्य सरकारने राणे यांना अटक Arrested केली. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठे तीव्र पडसाद उमटले आहे. पोलिसांनी Police राणे यांना रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हे देखील पहा-

सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलं आहे. नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईचे जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत Vinayak Raut ​यांनी केले आहे. यानंतर आता विनायक राऊत यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलं आहे. विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्ग मधील घरावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळाली आहे. ४ अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव या ठिकाणी असलेल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळली आहे.

सोडा बॉटल फेकल्यानंतर हे चौघेही पळून गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात राऊत यांच्या बंगल्याचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त समोर आली नाही. विनायक राऊत यांच्या बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त असताना हल्ला झाल्याचे समजत आहे. विनायक राऊत यांच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्यावर झालेला हा हल्ला राणे समर्थकांनी केला असल्याचा आरोप, शिवसैनिकांनी यावेळी केला आहे.

विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला, राणे समर्थकांवर आरोप
Vinayak Raut | विनायक राऊत यांची भाजपवर टीका, पाहा काय कारण आहे टीका करण्यामागे?,पाहा व्हिडिओ

यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतेय हे बघणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मंगळवारी सकाळपासून राणे यांच्या अटकेची चर्चा सुरू होती. भाजपलाही याची चांगलीच कुणकूण लागली होती. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्याचे राणेंचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. त्यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

तेथून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याअगोदर जिल्हा पोलिस अधीक्षक राणेंच्या अटकेसाठी पुढे आले. मात्र, उच्च न्यायालयाचा निकाल आला नसल्यामुळे सगळेच वेटिंगवर होते. अखेर त्याठिकाणी जामीन अर्ज फेटाळल्याची अधिकृत माहिती आल्यानंतर अटकेच्या हालचालींना वेग आलेला आहे. अखेर राणेंना ताब्यात घेऊन, सर्व लवाजमा संगमेश्‍वरकडे रवाना करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com