Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांनी बालपणीच्या मित्राला दाखवलं हेलिकॉप्टर, पाहा स्पेशल रिपोर्ट

Friendship Goals: राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक मित्रासोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमुळे झिरवळांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwalsaam tv
Published On

राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मित्रा सोबतचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. झिरवळांनी असं नेमकं काय केलं? ज्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. मंत्री नरहरी झिरवाळसाहेबांची बातच न्यारी, राजकाणापेक्षा दोस्ती एकमद प्यारी. साहेब हाडाचं राजकारणी.. पण दोस्तीत नो राजकीय कुस्ती हीच साहेबांचा फंडा आहे. आंदोलन असो वा असो भाषण साहेबांचा हात दुसरा कुणी नाय. आता यात भर पडलीय दोस्तीची हा व्हिडिओ पाहाच.

मंत्री झिरवळसाहेब कामानिमित्त हेलिकॉप्टपनं त्यांच्या मतदारसंघात गेलं होतं. मंत्री आलं का गराडा असतूच की, त्यात दिसला त्यांचा बालपणीचा मित्र मग काय? साहेब जुन्या आठवणीत गुंग. मित्र एकदम साधा आहे. अंगात मांजरपट कपड्याची जुनी बंडी डोक्यावर गांधी टोपी अन् पट्ट्या पट्याची हाफ पँट घातली होती. एकदम साधा माणूस. पण साहेबांनी मिठी मारली. दुसरा कुणी असता तर थोडा विचार केला असता.

Narhari Zirwal
Maharashtra Politics: भाजप महाराष्ट्रात संघटनबांधणीला नवे बळ, ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण

स्वतःच्या पांढऱ्या कपड्याचा पण आडपडदा ठेवण्याचा स्वभाव साहेबांचा नाही. झिरवळसाहेब म्हणाले चल तुला हेलिकॉप्टर दाखवतो. गडी दोस्त बी सोबतीला आला. हेलिकॉप्टर बघताच गड्यानं पायातलं जोड काढलं. इतका साधेपणा पहिल्यांदा पाहिला. दोस्ताची साहेबांनी अधिकाऱ्यांसंग ओळख केली. झिरवळांचे यश बघून मित्र जाम खूश झाले.

Narhari Zirwal
Thackeray Brothers : राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद; युती होणार की अटी-शर्तीमुंळे रखडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

झिरवळ साहेबांनी मित्राला हेलिकॉप्टर दाखवले. मित्र आनंदी झाला. तुम्हाला समाधान मिळालं पण राज्यातली जनतेच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पण पूर्ण करा म्हणजे जनता पण आनंदी आणि तुम्ही पण समाधानी राहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com