Poshan Aahar : अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात आढळल्या अळ्या, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत लहान मुलांना खराब पोषण आहार पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nandurbar News
Poshan AaharSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : शालेय पोषण आहारासंबंधी कायम तक्रारी समोर आल्या आहेत. निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा हि कायमची समस्या असून यात अजूनही सुधारणा होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात पुन्हा एकदा अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्या आहेत. अर्थात अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

Nandurbar News
Kalyan News : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने तक्रारदारच्या घरावर हल्ला; डोंबिवली कोपरमधील धक्कादायक घटना

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत लहान मुलांना खराब पोषण आहार पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंगणवाडीत वाटप करण्यात आलेल्या पोषण आहार निष्कृष्ट दर्जाच्या असून त्यात अळ्या आढळून आल्या आहेत. मुबारकपूर येथील अंगणवाडीतील मदतनीस महिलेने हाच (Poshan Aahar) पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यावर त्यात अळ्या आढळून आल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.  

Nandurbar News
Hatnur Dam : हतनूर धरणातून पाण्याचा विसर्गाने तापीला पूर; सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दोन दरवाजेही उघडणार

मुलांच्या जीवाशी खेळ 

अंगणवाडीत (Anganwadi) लहान बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. पुरवठा करण्यात आलेला पोषण आहारात अळ्या आढळल्याने पालक संतप्त झाले आहेत. यामुळे याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com