Nandurbar ZP: जिल्‍हा परिषदेत सर्व सभापती बिनविरोध

नंदुरबार जिल्‍हा परिषदेत सर्व सभापती बिनविरोध
Nandurbar ZP News
Nandurbar ZP NewsSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्‍हा परिषदेच्‍या विषय समिती सभापती निवड प्रक्रीया आज पार पडली. काँग्रेस (Congress) व बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) गटाच्या एकाही सदस्याने नामांकन दाखल केले नाही. तसेच सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे सर्व सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. (Maharashtra News)

Nandurbar ZP News
Chalisgaon: मुलीच झाल्या म्‍हणून सासऱ्याकडून छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar ZP) महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता भरत गावित, समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी तसेच उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी शिवसेना (उबाठा) चे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडी दरम्‍यान नाराजीनाट्य

सभापती पदासाठी शहादा येथील जयश्री दीपक पाटील व ऐश्वर्यादेवी रावल हे दोन्ही उमेदवार इच्छूक होते. माघारीच्या वेळेपर्यंत दोघांचीही मनधरणी नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे ऐश्वर्या रावल व जयश्री पाटील यांनी माघार घेतली. परंतु नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी निवड सुरू असतानाच सभेतून काढता पाय घेतला.

विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन्ही सदस्यांना सभापती पदाची संधी मिळाल्याने विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी समाधान व्यक्त करत. गद्दारांना जागा दाखवून दिली तसेच आम्ही गदारांसोबत गेलो असतो. तर आमचा विचार केला गेला नसता अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर तळोदा अशा सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देणे व प्रत्येक पक्षाला न्याय देऊनच सभापती निवडणूक घेण्यात आल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. हिना गावित यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com