नंदुरबारमधून बस सुटण्याची पुन्‍हा प्रतिक्षा; एकच दिवस धावली बस

नंदुरबारमधून बस सुटण्याची पुन्‍हा प्रतिक्षा; एकच दिवस धावली बस
st strike
st strike
Published On

नंदुरबार : एसटी संप २५ दिवसांनंतर शनिवारी कामावर रुजू झालेला चालक आला नसल्याने रविवारी एकही बस बाहेर पडली नाही. यामुळे आज पुन्हा बस सुरू होण्याची प्रवाशांना प्रतिक्षा लागून आहे. (nandurbar-news-Waiting-for-the-bus-to-leave-Nandurbar-again-Just-run-for-one-day)

st strike
Beed: 29 वर्षीय सैन्यदलातील जवान दिल्लीत वीरमरण

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, नवापूर, शहादा आणि नंदुरबार (Nandurbar) असे ४ आगार आहेत. जिल्ह्यात ३३४ एसटी बसेससाठी एक हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचारी असून गेल्या २७ दिवसांपासून चालक- वाहक विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहे. राज्यातील इतर आगारांमध्ये काही प्रमाणात एसटी बससेवा सुरु झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात ही एसटी प्रवासी वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

एक फेरीतून 1800 रुपये उत्पन्न

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार आगारातून २५ दिवसानंतर शनिवारी एक चालक कामावर रुजू झाल्याने नंदुरबार- धुळे बायपास बस पोलीस बंदोबस्तात रवाना झाली होती. धुळे-नंदुरबारसाठी १८ प्रवाशांची ने-आण करून शनिवारी नंदुरबार आगाराला १ हजार ८२० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र सदर चालक रविवारी कामावर आला नसल्याने काल एकही बस बाहेर पडली नव्हती. आज मात्र पुन्हा नंदुरबार आगारातून एसटी सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com