Nandurbar: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात फक्त 37 टक्केच पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात फक्त 37 टक्केच पाणीसाठा
Nandurbar
NandurbarSaam tv
Published On

नंदुरबार : गेल्या पावसाळी हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान झाले होते. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज प्रकल्प वगळता जिल्ह्यात कोणत्याही प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला नव्हता. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत नंदुरबार मध्यम प्रकल्पा अंतर्गत बांधकामाधीन असलेले पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ 56 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. तर बांधकाम पुर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. (nandurbar news Virchak Dam stores only 37 percent of the water)

Nandurbar
वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शेतमजुराला कायमचे अपंगत्व

आजच्या स्थितीला बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये 45 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेती व नागरिकांच्या पिण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केले जात असल्याची माहिती मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली आहे आहे.

पाण्याचे योग्य नियोजन हवे

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवण प्रकल्पातील विरचक धरणात ऑक्टोंबर 2021 पर्यंत केवळ 45 टक्केच पाणीसाठा उपलब्ध झाला होता. आजच्या स्थितीला केवळ विरचक धरणात 37 टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याने पुढील तीन महिने पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला जात आहे. विरचक धरणाच्या पाणीसाठ्यातून उन्हाळी हंगाम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पाणी न देता नंदुरबार शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे.

प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधील पाणीसाठ्यापासून वंचित

तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु या प्रकल्पांमधून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी असलेल्या प्रकल्पाधीन उपाय योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने पाणीसाठा उपलब्ध असूनही लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सारंगखेडा आणि प्रकाशा याठिकाणी प्रलंबित असलेल्या उपसा सिंचन योजना शासनाने लवकर पूर्ण कराव्या अशी मागणीही शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून जास्तीत जास्त जलसाठा उपलब्ध व्हावा या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com