सागर निकवाडे
नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील १० ते १२ गावांना जोडणाऱ्या बिलगाव येथील नर्मदा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नर्मदा नदीच्या (Narmada River) बॅक वॉटरमधून प्रवास करावा लागत आहे. या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी विविध संघटनी केली आहे. (Letest Marathi News)
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव तालुक्यांतील बिलगाव ते सवाऱ्यादिगर परिसरातील दहा ते बारा गावांना आणि पंधरा ते वीस पाड्यांना जोडणारा उदय नदीवरील पूल गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. जवळपास सात हजार नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र आदिवासी विकास विभाग आणि सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर या नदी पत्रात मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थी करतात होळीचा वापर
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा लोकांना बाजारहाटसाठी होडीचाच वापर करावा लागतो. चिमलखेडी, मणिबेली, भादल, बामणी, बिलगाव आदी गावातील बाहेरील जगाशी संपर्क ठेवण्यासाठी आजही दुर्गम भागातील बाधित संघर्ष करतांना चित्र बघायला मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.