पारंपारिक ढोल नृत्य, भक्तिमय वातावरणात होळी साजरी

पारंपारिक ढोल नृत्य, भक्तिमय वातावरणात होळी साजरी
Nandurbar
NandurbarSaam tv
Published On

नंदुरबार : अक्राणी मतदार संघाचे आमदार व राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या मूळ जन्मगावी असली येथे दरवर्षी (मानता) अर्थात नवसाची होळी काठी येथील राजवाडी होळीच्या आदल्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा मंत्री पाडवी (K C Padvi) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने होळीनिमित्त येऊ शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पिताश्री चांद्या बाबा यांनी पाडवी परिवाराची पारंपारिक (मानता) नवसाच्या होळीचे विधीवत पूजन करून भक्तिमय वातावरणात होळी साजरी करण्यात आली. (nandurbar news Traditional drum dance Holi celebrations in a devotional atmosphere)

आदिवासी पारंपारिक (Nandurbar News) ढोलच्या तालावर नवस धरलेले मोरपीस मोरखी, धानका डोको, होळी सेवेकरी आधी नृत्य कलाकारांनी सहभाग घेऊन पाडवी परिवाराच्या होळी सणाची शोभा वाढवली. यावेळी मान्यवर तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये होळी सणाचा अनन्य साधारण महत्त्व असल्याने आपल्या कौटुंबिक जीवनाचा वृद्धीसाठी नवस धारण करून होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. या होळी निमित्त आदिवासी पारंपारिक ढोल वाजवून विविध प्रकारचे नृत्य कला सादर करण्याची परंपरा आहे. यंदा १३ मार्चपासून जिल्ह्यातील दाब गावाहून होळी महोत्सवाला सुरुवात झाली असून येत्या २१ मार्चपर्यंत होलिका उत्सव सुरू राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com