Gram Panchayat Election Results: नंदुरबार जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

नंदुरबार जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व
Nandurbar Gram Panchayat Election
Nandurbar Gram Panchayat ElectionSaam tv

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागला. यात भाजपचे (BJP) वर्चस्व दिसून आले. ७५ ग्रामपंचायतीपैकी ४२ भाजप, २८ शिंदे गट, १ राष्ट्रवादी तर चार ग्रामपंचायतीवर अपक्ष लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले आहे. (Nandurbar Gram Panchayat Election Result)

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर ६ ग्रामपंचायती बिनविरोध (Election News) झाल्या होत्या. पैकी सुतारे, पथराई व वरूळ (Gram Panchayat) ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने तर देवपूर नटावद व भवानीपाडा ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला होता. दरम्यान १८ सप्टेंबरला नंदुरबार तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीसाठी ८२.०९ टक्के इतके मतदान झाले होते. आज (ता.१९) नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे मतमोजणीत झाली. यात ६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजपा, २५ शिवसेना (शिंदे गट), ४ अपक्ष तर १ राष्ट्रवादी पक्षाचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहे.

Nandurbar Gram Panchayat Election
Gram Panchayat Result: 32 ग्रामपंचायतींवर भाजप; शिरपूर तालुक्‍यात आमदार पटेलांचेच वर्चस्‍व

भाजपा विजयी झालेल्या ग्रामपंचायती

अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगळू, मालपूर, लोय, निंबगांव, कोठली, पावला, शिवपुर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपुर या ग्रामपंचायतीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले.

शिवसेना (शिंदेगट) विजयी झालेल्या ग्रामपंचायती

अजयपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आरर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली या ग्रामपंचयायतीवर शिंदेगटाने विजयी मिळविला आहे.

अपक्ष विजयी उमेदवार

नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील विजयी उमेदवारांनी अपक्ष निवडून आल्याचे सांगितले तर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर आधी ६ ग्रामपंचायतींपैकी ३ भाजपा व ३ शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील झालेल्या ७५ ग्रामपंचायतींमध्ये ४२ ग्रामपंचायती भाजपा, शिवसेना (शिंदेगट) २८, अपक्ष ४ व राष्ट्रवादीचा १, लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.

आदिवासी विकासमंत्री यांच्या पुतणीचा पराभव

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांची पुतणी तथा नंदुरबार पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत यांची मुलगी प्रतिभा जयेंद्र वळवी या दुधाळे ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंचपदासाठी भाजपाकडून उभ्या होत्या. त्यांना शिवसेनेच्या अश्‍विनी प्रकाश माळचे यांनी ५४१ मतांनी पराभव केला. दरम्यान नंदुरबार तालुक्यात लक्ष लागून असलेल्या कोळदे ग्रामपंचायतीत भाजपा तर होळतर्फे हवेली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे. दरम्यान नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांचे गांव असलेले आष्टे गावात भाजपाचा विजय झाला आहे.

एकूणच नंदुरबार तालुक्यातील 75 व शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होती. दरम्यान संध्याकाळी चार वाजेपर्यंत नंदुरबार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे मात्र शहादा तालुक्यात आतापर्यंत जवळपास 42 ग्रामपंचायतींचे जाहीर झाले असेल उर्वरित ग्रामपंचायतीचे निकाल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com