Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातून दोन आमदार देण्याचा शिंदे गटाचा निर्धार; मेळाव्यास आमदार पाडवी नसल्याने गटबाजीची चर्चा

Nandurbar News : नंदुरबार आणि धुळे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत शिंदे गटाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे झालेल्या मेळाव्याला विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी उपस्थित नसल्याने शिंदे गटात गटबाजी असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील दाब येथे शिवसेनेचा शिंदे गटाचा शिवदूत मेळावा झाला. नंदुरबार आणि धुळे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) आणि नवापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन राज्य सरकारच्या योजना आणि लोकांची काम करावी त्यातूनच आपल्याला मताधिक्य मिळणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सूचना त्यांनी केल्या.  

Nandurbar News
Beed News : बीडकरांसाठी आनंदाची बातमी..जिल्ह्यातील ८० प्रकल्प शंभर टक्के भरले; बिंदुसरा, सिंदफणा ओव्हरफ्लो

सदरच्या मेळाव्यासाठी अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र डाव येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी उपस्थित न राहिल्याने शिंदे गटातील अक्कलकुवा तालुक्यातील गटबाजीची चर्चा पुन्हा रंगात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हि गटबाजी उफाळून येणार का? हे येत्या काळातच समोर येईल.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com