नंदुरबारात विद्यार्थ्यांमध्‍ये उत्‍साह; नियम पाळत वर्ग सुरू

नंदुरबारात विद्यार्थ्यांमध्‍ये उत्‍साह; नियम पाळत वर्ग सुरू
Nandurbar school open
Nandurbar school open

नंदुरबार : जिल्ह्यात आज अनेक शाळा महाविद्यालयांची घंटा वाजली असुन, गेली दिड ते दोन वर्षे शाळेपासून दूर राहणारे विद्यार्थी आज शाळा शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभुती घेण्यासाठी उत्साहात दाखल झालेले दिसुन आले. कोरोनाच्या निर्बंधात सुरु झालेल्या शाळा आणि त्यातच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या चेहऱयावर समाधान फुलले होते. (nandurbar-news-school-open-after-coronavirus-Begin-the-class-following-the-rules)

महाराष्ट्र शासनाच्या शाळा सुरु करण्याच्या परिपत्रकानुसार आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक शाळा सुरू झाल्या असुन आज पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्सुर्तपणे उपस्थित झाल्याचे चित्र दिसुन आले. नंदुरबार जिल्ह्यात आठवी ते बारावी दरम्यान ३३९ शाळा असुन यात जवळपास ९० हजार ८८५ विद्यार्थी आहेत. मात्र शाळा उपस्थितीबाबत असणारे निर्बधांमुळे आज ऑड इव्हन पद्धतीचा अवलंब करत शाळांनी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावल्याचे चित्र होते.

बैठक व्‍यवस्‍था एक बाक सोडून

विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर थर्मामिटरद्वारे त्याची तपासणी सॅनिटायझेशन करुन वर्गात एक बाक सोडुन एक विद्यार्थी अशी खास बैठक व्यवस्था देखील करण्यात आली होती. यासाठी शिक्षण विभागासह शाळा व्यवस्थापनाने खास मेहनत केल्याचे दिसून आले.

Nandurbar school open
शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू

विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचा आनंद

गेली वर्षे दिड वर्षे विद्यार्थी मोबाईल आणि संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. त्यात त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यात त्यांना तांत्रिक अडचणी देखील येत होत्या. शाळा आणि वर्ग मित्रांना मिस करण्याचे दुःख ही वेगळे; त्यामुळेच आजपासुन प्रत्यक्षात शाळा सुरु होणार असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाच्या अनुभुतीसह आपल्या सख्या सवंगड्यांना भेटण्याचा आनंदाने भारावलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मास्क सारखे निर्बंध असले तरी चालेल मात्र प्रत्यक्ष शाळेत जावुन शिक्षण घेण्याचा आनंद आणि मज्जा काही वेगळीच असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्याकडून पहायला मिळाल्या.

धोक्‍याची घंटा ठरु नये..

शाळा सुरु झाल्याची घंटा वाजली असली तरी कोरोनाच्या सर्व बाबीतून ही धोक्याची घंटा ठरु नये; यासाठी शाळा व्यवस्थापनासह साऱयांनीच मेहनत घेण्याची गरज आहे. नाहीतर शाळा सुटली आणि पाटी फुटली अशीच काहीशी गत होवुन शिक्षण विभागाचा हा निर्णय अंगलट येण्याची भिती व्यक्त होत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेतली आणि विद्यार्थ्यांनी देखील याबाबत जागरुकता ठेवली, तरच शाळांमधील ही चिवचिवट अशीच निरंतर सुरु राहील यात दुमत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com