Nandurbar News : सातपुड्याच्या दुर्गम भागातील भीषण वास्तव, आजही गाढवावर साहित्याची वाहतूक; आदिवासींची 27 किलोमीटरची पायपीट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक आदिवासी पाड्यांवर जायला रस्ते नाहीत. यामुळे येथील आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : विज्ञान तंत्रज्ञान खूप पुढे गेले असून आजच्या या रोबोटिक युगात माणसाची कामे यंत्र करू लागली आहेत. अशा या रोबोटिक युगात वावरत असताना देखील नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ भागात असलेले झापी, खडकी, कुंड्या लाकडा, सावऱ्या या आदिवासी पाड्यांवर आजही सामान वाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जात आहे. दळणवळणाची सुविधा नसल्याने सातपुड्याच्या भागात हे धक्कादायक वास्तव पाहण्यास मिळत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अनेक भागात आजही दळणवळणाची सुविधा अद्याप झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक आदिवासी पाड्यांवर जायला रस्ते नाहीत. यामुळे येथील आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत. मात्र असुविधांचा कुठलाही बाऊ न करता येथील आदिवासी बांधव हे आपलं जीवन साधा पद्धतीने जगतानाच पाहायला मिळत आहे. शासनाने या गोष्टींकडे लक्ष देत आता तरी (Satpuda) आदिवासी पाड्यांपर्यंत दळणवळणाच्या सुविधा पोहोचवणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Nandurbar News
Nagpur News : धक्कादायक! सुनेने सुपारी देऊन सासूला संपवलं, अंत्यविधीही उरकला; पोलिसांनी असा लावला हत्येचा छडा

२७ किमीची पायपीट 

दरम्यान खडकी गावात राहणारे रोहिदास पावरा त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी, तीन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. अल्पभूधारक शेती असल्याने आपला परिवाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी आपल्या घरी एक किराणा दुकान उघडला आहे. अतिदुर्गम भाग असल्यामुळे त्या गावात दळणवळणाच्या सुविधा पाड्यावर जायला रस्ता नाही, वीज नाही. रोहिदास पावरा यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. तर फक्त दोन गाढव आणि या दोन गाढवांनाच घेऊन ते आपलं काम करत आहेत. त्यांच्या गावापासून २७ किलोमीटर लांब असलेल्या गावात जाऊन ते किराणा सामान आणि इतर जीवन उपयोगी साहित्य खरेदी करून ते गाढवावर लादून आणत असतात. दोन गाढवांना सोबत घेऊन त्यांना २७ किलोमीटरची पायपीट करावी लागत असते. त्यात त्यांना पूर्ण दिवस आपल्या प्रवासात घालवावा लागतोय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com