महाराष्‍ट्रात राजकीय टोळी युद्धाने शेतकऱ्यांची वाताहात; राजू शेट्टी यांचा आरोप

महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे, कि आर्यन खानला जामीन कधी होणार आणि समीर वानखेडेवर नेमकी कारवाई काय होणार? बाकीचे प्रश्न किरकोळ
Raju Shetty
Raju Shetty

नंदुरबार : आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्ध सुरु असल्याने शेतकऱ्यांची वाताहात होत आहे. त्यांचे प्रश्न बाजुला पडुन सगळ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे, कि आर्यन खानला जामीन कधी होणार आणि समीर वानखेडेवर नेमकी कारवाई काय होणार? बाकीचे प्रश्न किरकोळ वाटत असल्याने याला केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेले चारही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप राजु शेट्टी यांनी केला आहे. (nandurbar-news-raju-shetty-press-and-maharashtra-goverment-target-in-farmer-issue)

नंदुरबार जिल्‍ह्यातील प्रकाशा येथे आयोजित शेतकरी मेळावा कार्यक्रमानिमित्‍ताने शेट्टी आले होते. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या वीज कंपनीकडुन वीज कनेक्शन कापल्या जात असल्याविरोधात त्यांनी आक्रमक भुमिका घेत स्वाभीमानी या प्रश्न रस्त्यावर उतरुन वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा हातात घेण्याची भुमिका जाहीर केली आहे.

शासनाने अंतर्भुत विचार करण्याची गरज

आमच्यावर संस्कार असल्याने येणारी पिढी व्यसनाधिन व्हावी आम्हाला असे वाटत नाही. त्यामुळे सधन होण्यासाठी गांजा लागवड करण्याची परवानगी मागण्याचा आतेताईपणा आम्ही करणार नाही. मात्र शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी का परवानगी मागत आहे; याचा शासनाने अंतर्भुत विचार करण्याची गरज असल्याचे राजु शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetty
५० टक्के वीज बिल भरून शेतकऱ्यांचे कनेक्शन सुरू करावे; आमदार पाडवींची मागणी

खोत यांच्‍यावर निशाणा

फालतु बडबड करणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या हाकेवर लाखो शेतकरी रस्त्यावर येतात. यांचा तथाकथीत शेतकरी नेत्यांनी अंतर्मुख होवुन विचार करावा. त्यांच्या हाकेला शेतकरी धावुन का येत नाही? याचे त्यांनी आत्मपरिक्षण देखील करावे असा टोला सदाभाऊ खोत यांचे नावे न घेता शेट्टी यांनी लगावत मी कोण्या आमक्या बरोबर आहे किंवा नाही या पेक्षाही मी फक्त शेतकऱ्यांसोबत असल्‍याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com