तीन महिन्‍यात हरविलेले महिला, बालक सापडले; मिसिंग डेस्क मोहिम

तीन महिन्‍यात हरविलेले महिला, बालक सापडले; मिसिंग डेस्क मोहिम
Nandurbar Police
Nandurbar PoliceSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात बेपत्ता झालेले महिला, बालके व पुरुष यांच्या 123 तक्रारी मिसिंग या शीर्षकाखाली दाखल झालेल्या होत्या. त्‍या अनुषंगाने जिल्हा पोलिस (Police) दलात मिसिंग डेस्कची स्थापना करत गेल्या तीन महिन्यात हरवलेल्या 79 महिला व 9 बालकांना शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. (nandurbar news Missing desk campaign and Missing woman child found in three months)

Nandurbar Police
भाजप सरकारचे केले राम नाम सत्‍य है..; मोदींचा पुतळा दहन करत कॉंग्रेसचे निदर्शने

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा पोलिस दलात या आधी बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या तपासाची आकडेवारी निराशाजनक असल्याने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी १ जानेवारीपासून जिल्हा पोलिस मुख्यालयात मिसिंग डेस्कची स्थापना करून विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत गेल्या तीन महिन्यात मिसिंग डेस्क कर्मचाऱ्यांना हरवलेल्या 25 महिला व 3 बालके शोधण्यात यश आले. तर पोलीस स्टेशनस्तरावर राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत 54 महिला व 6 बालकं असे एकूण 79 महिला व 9 लहान बालके शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे.

गुन्हे तपासा बरोबरच बेपत्ता बालके व महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेपत्ता बालके व महिला मिळुन येण्यास नंदुरबार पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा.पो उप निरीक्षक भगवान धात्रक हे काम करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com