Lumpy Disease: नंदुरबार जिल्ह्यात लम्पीने दगावली ९६ जनावरे

नंदुरबार जिल्ह्यात लम्पीने दगावली ९६ जनावरे
Lumpy Disease
Lumpy DiseaseSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्‍ह्यात लम्पी स्कीन रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत असून (Nandurbar News) जिल्‍ह्यातील ३ लाख ३ हजार ३६५ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान ३४ गावातील सुमारे १ हजार ९१ जनावरांना लम्पीची (Lumpy Disease) बाधा झाली होती. यातील ७२२ जनावरे उपचारादरम्यान बरी झाली असून २७३ जनावरांवर उपचार सुरु आहेत. अद्यापपावेतो ९६ जनावरे लम्पीने दगावली आहेत. (Maharashtra News)

Lumpy Disease
पोलीस ठाण्यात केलेले 'रील' पडले महागात

जिल्‍ह्यात सद्यस्थितीत लम्पी नियंत्रणात आहे. १०० टक्के लसीकरण झाले आहे. असे असले तरी गोचीड, गोमाशांमुळे लम्पी विषाणूचा (Lumpy Virus) प्रादूर्भाव होतो. यामुळे पशुपालकांनी गोठ्यात किंवा पशु राहत असलेल्या ठिकाणी गोचीड, गोमाशा नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. गंभीर पशु रुग्णांवर उपचारासाठी जिल्‍ह्यात ४८ जलद कृतीदल कार्यरत आहेत. पशुपालकांनी गोचीडपासून काळजी घ्यावी.

६२ जनावरांची नुकसान भरपाई

नंदुरबार जिल्‍ह्यात सुमारे ३ लाख ३ हजार ३६५ इतके गोवर्गीय पशुधन आहे. लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुधनास लसीकरण करण्यासाठी ३ लाख ४ हजार ३०० लस मात्रा उपलब्ध झाल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यु. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने १०० टक्के पशुधनास लसीकरण केले आहे. दरम्यान लम्पीमुळे ३४ गावातील १ हजार ९१ इतक्या जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. यातील ७२२ जनावरे औषधोपचाराने बरी झाली आहेत. तर सद्यस्थितीत २७३ जनावरांवर उपचार सुरु आहेत. लम्पीमुळे ९६ जनावरे दगावली आहेत. यातील ६२ जनावरांची नुकसान भरपाई प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जिल्‍ह्यात अशी आहे स्‍थीती

नंदुरबार तालुका– ४२ हजार ९५३ गोवर्गीय पशुधन, २७ जनावरांना लम्पीची बाधा, ३ जनावरांचा मृत्‍यू

नवापूर तालुका – ६० हजार ९१ गोवर्गीय पशुधन, ६ जनावरे बाधीत, १ जनावराचा मृत्‍यू

शहादा तालुका– ४८ हजार ५७१ पशुधन, ९९ जनावरांना बाधा, ५ जनावरांचा मृत्‍यू

तळोदा तालुका– ३४ हजार ५१० जनावरे, २४ जनावरांना बाधा, ५ जनावरांचा मृत्‍यू

अक्कलकुवा तालुका – ४६ हजार ४५७ जनावरे, ३०६ जनावरांना बाधा, २१ जनावरांचा मृत्‍यू

धडगाव तालुका– ७० हजार ७८३ पशुधन, ६२९ जनावरांना बाधा, ६१ जनावरांचा मृत्‍यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com