नंदुरबार : अक्कलकुवा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक होवून वाहनांची तोडफोड झाली होती. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाडला. इतकेच नाही तर हा बंद बेमुदत (Nandurbar News) ठेवण्याचा इशारा दिला आहे. (nandurbar Indefinite village closure of villagers to protest Akkalkuwa stone throwing)
व्हाट्सअप (Whats app) स्टेटस ठेवण्याच्या वादातून शेकडोंच्या संख्येने असलेल्या एका समूहातील समाजकंटकांनी अक्कलकुवा (Akkalkuwa) शहरात 10 जून रोजी मध्यरात्री तुफान दगडफेक केली. यात शहरात दुचाकी चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत आरोपीची धरपकड सुरू केली आहे.
मुख्य आरोपींवर कारवाईची मागणी
अक्कलकुवा शहरात नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला आहे. दरम्यान इतर संशयित मुख्य आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी शहरात 11 जूनपासून सलग दुसऱ्या दिवशीही (12 जून) कडकडीत बंद पाळला आहे. जोपर्यंत मुख्य गुन्हा घडवून आणणारे आरोपींवर कारवाई होत नाही; तोपर्यंत बेमुदत गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना निवेदन सादर करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.