Nandurbar News: घराला आग; संसार उपयोगी साहित्यासह ४ लाख रुपये रोख जळून खाक

घराला आग; संसार उपयोगी साहित्यासह ४ लाख रुपये रोख जळून खाक
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार तालुक्यातील तलवाडे (शनिमांडळ) गावात घराला आग (Fire) लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक (Nandurbar) नुकसान झाले आहे. यात कुटूंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Nashik News: धक्कादायक..नाशिकमधील ४२ अल्पवयीन मुली, १६७ तरुणी बेपत्ता; चार महिन्‍यातील आकडेवारी

तलवाडे (नंदुरबार) गावात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास तलवाडे गावातील गोसावी यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने पाहता पाहता तीव्र रूप धारण केल्याने संपूर्ण घरात आग पसरली. आगीची माहिती मिळाल्यानंतर गावातील तरुणांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आधी झालेल्या नुकसानीचा अंदाज आला असून घरातील संसार उपयोगी साहित्य आणि शेतीमाल विकून आलेली ४ लाख रुपये रोकड आगीत जळून खाक झाले आहे.

Nandurbar News
Nandurbar News: प्रो-कबड्डी खेळण्याचे स्वप्न भंगले; कबड्डी खेळाडूचा पाण्यात बुडून मृत्यू

आगीचे कारण अजून समजले नसून तालुका पोलीस स्टेशनला अग्नी उपद्रव कायद्यानुसार तक्रार देण्यात आली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी पीडित परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com