Nandurbar News: ग्रामपंचायतच देणार लग्नाला ना-हरकत प्रमाणपत्र; लाउडस्पीकरवरून दिली जातेय ग्रामसभेची माहिती

ग्रामपंचायतच देणार लग्नाला ना-हरकत प्रमाणपत्र; लाउडस्पीकरवरून दिली जातेय ग्रामसभेची माहिती
Gram Sabha Nandurbar News
Gram Sabha Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील भूजगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविले जात असून सध्या भूजगाव ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) मोठ्या प्रमाणावर वर्तमान पत्रातून प्रसिद्धी होत आहे. ग्रामसभा म्हटली कि भांडणे आरडा-ओरड पक्के ठरलेलेच. त्यामुळे गाव विकासा संदर्भात ग्रामसभा अत्यंत महत्वाची (Nandurbar News) असून देखील नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवतांना दिसतात. ग्रामपंचायत भूजगाव येथे ग्रामसभा झाली असून या ग्रामसभेचा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रामसभेकरिता ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात मोकळ्या मैदानात चक्क मंडप लावण्यात आला. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवाज पोहचावा यासाठी माईक आणि स्पीकरची सोय करण्यात आली होती. (Breaking Marathi News)

Gram Sabha Nandurbar News
Sangli News: सांगलीत रास्ता रोको आंदोलन; विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बालविवाह संदर्भात ठराव

नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बालविवाह या महत्वाच्या प्रश्नावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभेत सखोल चर्चा करून बालविवाह (Child Marriage) प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करण्यात आला. हरणखुरी व भुजगाव गाव बालविवाह बंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. या पुढे बालविवाह झाल्यास बाल प्रतिबंधक अधिनियमान्वये कारवाई केली जाणार. ग्रामसभेत बाल विवाहास बंदीचा ठराव मंजूर करणारी भूजगाव ग्रामपंचायत कदाचित राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणारी असावी.

लग्‍नासाठी ना– हरकत प्रमाणपत्र

सदर ठरवात ग्रामपंचायत परिक्षेत्रात बालविवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायत परिक्षेत्रात लग्न पत्रिका छापतांना मुलीचे १८ वर्ष आणि मुलाचे २१ वर्ष पूर्ण झाल्याची नोट लिहिणे बंधनकारक असेल. तसेच लग्नापूर्वी वधू व वराचे वयाचा पुरावा ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक राहील. यानंतर लग्नासाठी वयाचा पुरावा दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. अल्पवयीन मुला-मुलीनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केले अश्या बालकाच्या विरोधात गावातील वरिष्ठ नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाणार. बाल विवाह करणे गुन्हा असल्याचा गावाच्या मुख्य चौकात फलक लावण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com