Gram Panchayat Reservation : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आरक्षण; ६३९ पैकी ३२२ ग्रामपंचायतींवर महिलाराज

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच आरक्षण प्रक्रीया जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चिठ्ठी काढून आरक्षण ठरविण्यात आले
Gram Panchayat Reservation
Gram Panchayat ReservationSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी हे आरक्षण काढण्यात आले असून आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतमध्ये एकूण ६३९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात आले. यात तब्बल ३२२ ग्रामपंचायतींवर महिलाराज बसणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच आरक्षण प्रक्रीया जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चिठ्ठी काढून आरक्षण ठरविण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ३२२ ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे. यामध्ये पेसा क्षेत्रातील २८३, तर नॉनपेसा क्षेत्रातील ३९ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच राहणार असल्याचे आरक्षण सोडतीअंती निश्चित करण्यात आले.  

Gram Panchayat Reservation
Leopard : गुजरातचे बिबटे महाराष्ट्रात; सहा महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ९ बळी, सहा बालकांचा समावेश

पुढील पाच वर्षांसाठी आरक्षण 

नंदुरबार जिल्ह्यात काढण्यात आलेले आरक्षण हे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आहे. जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण प्रक्रीया पार पडली. सात वर्षीय लावण्या प्रविणकुमार महाजन या बालिकेने चिठ्ठ्या काढल्या. त्यानुसार महिला आरक्षण ठरविण्यात आले. यामध्ये पेसा क्षेत्रातील ५६३ ग्रामपंचायती आहेत, आरक्षण सोडतीप्रसंगी उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भामरे, गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा रमेश वळवी आदी उपस्थित होते. 

Gram Panchayat Reservation
Tansa Forest : अजबच.. जंगलातुन लाकडांची वाहतूक करण्यास वन विभागाने दिली परवानगी; गावकऱ्यांनी अडविला ट्रक

तालुकानिहाय सोडत काढलेल्या ग्रामपंचाय 

नंदुरबार तालुक्यातील ९७ पैकी ४९ ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण असणार आहे. तर शहादा तालुक्यातील ११६ पैकी ५८, नवापूर तालुक्यातील ११६ पैकी ५८, तळोदा तालुक्यातील ६८ पैकी ३४, अक्कलकुवा तालुक्यातील ७९ पैकी ४० तर अक्राणी तालुक्यातील ८८ पैकी ४४ ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण असणार आहे. नॉन पेसा क्षेत्रातील ७६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी २२ तर शहादा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. यामुळे एकूण ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com