१०८ रुग्णवाहिका व्यवस्थापकांची अफरातफर; स्पेअर पार्ट, मेडिसिनमध्ये लूट, कर्मचाऱ्यांचा आरोप

१०८ रुग्णवाहिका व्यवस्थापकांची अफरातफर; स्पेअर पार्ट, मेडिसिनमध्ये लूट, कर्मचाऱ्यांचा आरोप
Nandurbar Ambuance
Nandurbar AmbuanceSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाहता अक्कलकुवा, धडगाव, मोलगी, तोरणमाळ अतिदुर्गम भागात १०८ रुग्णवाहिका (Ambulance) आपात्‍कालीन गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात जवळपास १४ रुग्णवाहिका आहेत. त्यासाठी ३२ पायलट व २५ डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांनी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात त्या विपरीत १०८ रुग्णवाहिकेची अवस्था आहे. १४ पैकी जेमतेम पाच ते सहा गाड्या सुरू (Nandurbar) असल्याची माहिती कार्यरत पायलटांकडून प्राप्त झाली आहे. अनेक गाड्यां नादुरुस्त आहे. तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. (Nandurbar News Ambulance Fraud)

१०८ रुग्णवाहिकेची सेवा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात दोन व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु गेल्या १५ दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे व्यवस्थापक राहुल पाटील व उपव्यवस्थापक निलेश पाटील यांना पुणे वरिष्ठ कार्यालयाकडून कामावरून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते.‌ दरम्यान जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका पायलट व (Doctor) डॉक्टर यांनी बंद पुकारत त्यांना कामावर घ्यावे; अशी मागणी केल्यानंतर राहुल पाटील यांना कामावर न घेता निलेश पाटील यांना कामावर घेत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे.

Nandurbar Ambuance
Amol Mitkari: अब्‍दुल सत्‍तारांचे कोणते हिंदुत्‍व; अमोल मिटकरी यांची टीका

आवाज उठविल्‍यास कमी करण्याची धमकी

व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याकडून नांदुरुस्त गाड्यांचे वेळेत मेंटेनन्स न करणे. तसेच गाड्या दुरुस्तीच्या नावाखाली आणि डिझेल व स्पेअर पार्ट याबाबत मोठी गफलत केली जात आहे.‌ ज्या पायलट आणि डॉक्टरांनी याबाबत आवाज उठवला की त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे आदी प्रकार घडत आहे. सदर व्यवस्थापकाला वरिष्ठांनी कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले असता ज्यांनी कामावर घेण्याची विनंती केली त्यांच्‍याच बरोबर दुजाभाव करून मोठी अफरातफर केली जात असल्याचे समोर आले आहे.

जवळच्या व्यक्तींना कामावर रुजू

जिल्ह्यात जवळपास निम्म्या रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत.‌ त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी अतिरिक्त पायलट व डॉक्टर नसतानाही दुसऱ्याच्या नावावर हजेरी भरून पेमेंट काढणे आदी काम व्यवस्थापकाकडून केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. गेल्या आठ– दहा वर्षापासून कामावर असलेल्या रुग्णवाहिका चालकांना कामावरून काढून टाकत त्याच्या जवळच्या व्यक्तींना कामावर रुजू करणे, जवळच्या व्यक्तींचा पेमेंट वेळेत व जास्त दिवसांची हजेरी लावून अधिकचा पेमेंट काढणे, तसेच दुर्गम भागात अतिरिक्त पायलट नसतानाही डोंगरदऱ्यातील दरड कोसळत असलेल्या रस्त्यांवर रात्री अप त्री २४ तास सेवा देणाऱ्या पायलट व डॉक्टरांना मुद्दाम त्रास देणे. आदी कामे व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याद्वारे केली जात असून; वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोलगी येथे अतिरिक्त चालक नसतानाही दुसऱ्याच्या नावावर पेमेंट काढले गेले. तसेच त्याने २४ तास ड्युटी केली असतानाही त्याला कमी पेमेंट दिले गेले. धडगाव व बिलगाव येथील १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसतानाही स्वॅप कार्डने डिझेल भरले जाते. तसेच धडगाव येथील कॉल असल्यावर मोलगीची गाडी मागवून शहादा २०० किलोमीटर फेरा मारायला लावत आहे. याबाबत विचारणा केली असता व्यवस्थापक निलेश पाटील यांनी कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत व्यवस्थापकावर कारवाईची मागणी पायलट शंकर तडवी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com