Nandurbar: नर्मदा काठावर तरंगता दवाखाना; आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोबो ॲप

नर्मदा काठावर तरंगता दवाखाना; आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोबो ॲप
Nandurbar
NandurbarSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. परंतु यापैकी अनेक योजना योग्य नियोजनाअभावी अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना योजनांपासून वंचित राहावे लागते. (Akkalkuwa) अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील ३३ पाड्यांना तरंगता (Hospital) दवाखान्याची सुविधा आहे. मात्र कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने आरोग्याचा बोजवारा उडत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर 'कोबो' ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेकिंगद्वारे आरोग्यसेवा सुधारण्याची मोहीम आखली आहे. (nandurbar Floating dispensary on the hospital of Narmada Cobo app to improve health system)

Nandurbar
Womens Day: ‘कोरोना’ने कुंकू पुसले..जिद्दीने कुटुंब सावरले

नर्मदा (Narmada River) काठावरील ३३ गाव-पाड्यांमधील रहिवाशांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून तरंगता दवाखाने (बोट एंबुलेंस) सुरू करण्यात आल्या आहे. मात्र यावर कार्यरत असणारे कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने नर्मदा काठावरील रहिवासी आरोग्य सेवेपासून वंचित राहत असल्याची तक्रार जि.प. सदस्यांकडून स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेत दुसऱ्याच दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ग़ोविंद चौधरी यांनी पथकासह भेट देऊन. येथील रहिवाशांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी आता नर्मदा काठावर असणाऱ्या बोटी तरंगत्या दवाखान्यांचे व कार्यरत कर्मचाऱ्यांचे 'कोबो' ॲपच्या माध्यमातून 'ऑनलाईन ट्रॅकींग' केले जाणार असून या भागातील आरोग्य सेवा सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एक दवाखाना नादुरूस्‍त

अक्कलकुवा व धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील नर्मदा काठावरील ३३ पाड्यांवर आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात एक तरंगता दवाखाना व तीन बोटी देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन अक्कलकुवा व दोन धडगाव तालुक्यासाठी सध्या कार्यरत आहेत. तर एक तरंगता दवाखाना जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून नादुरूस्त झाल्याने पडून आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या बोटीला आरोग्य विभागाकडून जणू जलसमाधी दिली जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रशासनाने नादुरुस्त बोट दुरुस्त केली जाईल.

दररोज माहिती करावी लागेल अपलोड

नर्मदा काठावर आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'कोबो' ॲपच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरच्या ॲपमध्ये दैनंदिन कामकाजाची माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन ट्रॅकींग होण्यासदेखील मदत होणार आहे. माहिती अपलोड करतांना नेटवर्कची अडचण असल्यास नेटवर्कमध्ये आल्यावर माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. यामुळे आता दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवरदेखील या माध्यमातून नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. सोबत गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या निर्णयाद्वारे दुर्गम भागातील आरोग्य सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com