Shahada News : शहाद्यात बोगस आयुर्वेदिक औषधी निर्मिती; अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Nandurbar News : शहादा शहरातील खेतिया रस्त्यावरील एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना औषधांची निर्मिती करण्यात येत होती. या कारखान्याबाबतची गुप्त माहिती अन्न व औषधी प्रशासनाला मिळाली
Shahada News
Shahada NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : शहादा शहरातील खेतिया रस्त्यावरील मलोणी शिवारात विना परवानगी आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती. या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जप्त करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शहादा शहरातील खेतिया रस्त्यावरील एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना औषधांची निर्मिती करण्यात येत होती. या कारखान्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहायक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने छापा टाकला. 

Shahada News
Nandurbar Police : अवैध्यरित्या गॅस रिफिलिंग; पोलिसांची धाड टाकत कारवाई, सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

शक्तिवर्धक हेल्थकेअर उत्पादन निर्मिती 
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत असल्याचे आढळून आले. या फॅक्टरीमध्ये तायके हेल्थकेअर नामक कंपनी मार्फत चवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात होती. त्यानंतर तयार केलेले उत्पादन पुणे येथे रवाना करत ते देशभर विक्री केली जात होती.

Shahada News
Papaya Crop : पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव; नंदुरबार जिल्ह्यात उत्पादक शेतकरी संकटात

कारखान्यातील साहित्याला सील 

दरम्यान कारवाईत पथकातील अधिकाऱ्यांनी औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेल्या परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांकडे हि कागदपत्र नव्हती. यामुळे विनापरवाना औषधाची निर्मिती केली जात असण्यावर फॅक्टरीतील साहित्याची तसेच कच्चा व पक्का मालासह औषध निर्मीतीसाठी असलेले साहित्य सील करण्यात आले आहे. या कार्यवाहीत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com