Nandurbar: आठशे वर्षाची परंपरा; अक्कलकुवात रंगली घोड्यांची शर्यत

आठशे वर्षाची परंपरा; अक्कलकुवात रंगली घोड्यांची शर्यत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : दसरा उत्सवानिमित्त पुजारी बाबांद्वारे नवाय खांब येथे पूजा व घोड्यांची पूजा करून राजघराण्यातील अठरावी पिढीतील सदस्य पृथ्वीसिंग दादा पाडवी यांच्या उपस्थितीत राजगादीच्या (Nandurbar) पूजनानंतर घोड्यांच्या शर्यतीचा नारळ फुटल्यानंतर शर्यतीला सुरुवात झाली. (Nandurbar News Dasara Utsav)

Nandurbar News
Nana Patole: मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचत होते; नाना पटोलेंचा आरोप

सातपुड्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील काठी संस्थांनच्या राज घराण्याकडून १२४६ सालापासून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा ८०० वर्षानंतर आजही काठी संस्थान राजघराणे व नागरिकांद्वारे सुरू आहे. सातपुडा (Satpuda) पर्वतरांगांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने राजा महाराजांच्या काळात घोड्याला मोठे महत्त्व होते. दसरा (Dussehra) सणानिमित्त घोड्याचे पूजन करण्याची मोठी परंपरा होती. विशेष म्हणजे घोड्याची पूजा झाल्यानंतर घोड्यांची शर्यत लावली जाते. आजही ही परंपरा टिकून आहे. काठी संस्थानातील नवाय खांब पूजन झाल्यानंतर राजघराण्यातील राजांच्या राजगादीची पूजा केली जाते. त्यानंतर घोड्यांच्या शर्यतीची रेस लावली जाते.

८८ घोडेस्‍वारांचा सहभाग

घोड्यांच्या शर्यतीमध्ये यंदा गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास ८८ घोडेस्वारांनी सहभाग नोंदवला होता. काठी संस्थांनचा दसरा पूजन व घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी सातपुड्यासह गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशी घोड्यांची शर्यत पार पडल्यानंतर गरबा नृत्य कलाकार व विजेत्या घोडेस्वारांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com