सागर निकवाडे , नंदुरबार
शहादा कलसाडी रस्त्यावर पिंगाणे गावानजीक गोवा राज्यात निर्मित बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच मृत्यू झाला असून ट्रॉलीमधील सुमारे लाखो रुपये किमतीची दारू रस्त्यावर विखुरली होती. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दारूचे खोके अक्षरशा लुटून नेले.
शहादा कलसाडी रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती ती ट्रॉली उलटल्यामुळे त्याचा आवाज परिसरातील एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. विशेष म्हणजे या ट्रॉलीमध्ये वरून पेवर ब्लॉक तर त्याखाली गोवा राज्यात निर्मिती बनावट दारूचे सुमारे 400 पेक्षा अधिक खोके ठेवण्यात आलेले होते. ट्रॉली उलटल्यामुळे यातील पेवर ब्लॉक व बनावट दारू रस्त्यासह रस्त्याच्या पलीकडे पडले. ड्रायव्हर सीट खालीच अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरू केली आहे.
या भीषण अपघातात चालक जागीच ठार झाला असून त्याची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अपघात घडल्यानंतर ट्रॉली मधील पेवर ब्लॉक व मद्याचे खोके रस्त्यावर पडल्यानंतर सदर मद्य लुटून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी ही दारू लुटून नेली उपस्थित नागरिक व पोलिसातर्फे दारू नेणाऱ्या नागरिकांना आव्हान केले जात असतानाही आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू अनेकांनी लुटुन नेली. ही मद्यतस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती याला कोणाचा आशीर्वाद होता तसेच या अनोख्या प्रकाराद्वारे आतापर्यंत किती बनावट मद्याची वाहतूक व तस्करी केले याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी पदभार सांभाळल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे व तस्करी विरोधात विशेष मोहीम राबविली आहे. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले असून बनावट मद्याची वाहतूक अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धुळ टाकून आपले उद्योग सुरू ठेवले आहेत. पेवर ब्लॉक खाली दारूचे खोके लपवून तस्करी करण्याचा हा अनोखा प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे. सदर दारू ही गोवा राज्यात निर्मित असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असले तरी ती मध्य प्रदेश राज्यात निर्मित करण्यात आली असून विक्रीसाठी गुजरात राज्यात पाठविण्यात येत असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.