२१ वर्षानंतर धोकादायक घाट रस्त्याचे काम; तेही निकृष्‍ट दर्जाचे

२१ वर्षानंतर धोकेदायक घाट रस्त्याचे काम; ते ही निकृष्‍ट दर्जाचे
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी शहादा मार्गे 150 किलोमीटर तर अक्कलकुवा (Akkalkuwa) मार्गे 170 किलोमीटर लांब अंतर वेळ वाया घालवूण जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त यावे लागत होते. हे अंतर कमी व्हावे यासाठी 2001 साली धडगाव– तळोदा चांदसैली घाटमार्गे रस्ता तयार करण्यात आला. त्याच वेळेस या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता बंद पडून नागरिकांची वाट बंद होते. (nandurbar news Dangerous Ghat road work after 21 years but inferior quality)

Nandurbar News
सेंट्रल किचनची योजना संपुर्ण भारतात राबविण्याचा प्रयत्‍न; केंद्रीय आरोग्‍य मंत्री मांडवीया

धडगाव तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनंतर शहादा बांधकाम (Nandurbar News) विभागांतर्गत असलेल्या घाट रस्त्याचे काम ड्रीम डेव्हलपर्स नावाच्या ठेकेदाराला देण्यात आले आहे. सदर ठेकेदाराकडून रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पराडके यांनी तक्रार करून काम बंद पाडले आहे. धडगाव तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा रस्ता असल्याने सदर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे; अशी मागणी नागरिकांची आहे. परंतु सदर डांबरीकरण ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सदर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करायचे असेल तरच करा अन्यथा बंद करा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

वन विभागाचीही अडवणूक

विशेष म्हणजे सदर रस्ता सातपुडा पर्वतरांगांमधील डोंगरदर्याचा असल्याने वन विभागानेही सदर रस्ता विकास कामासाठी अडवणूक केली आहे. या रस्त्याबाबत नऊ मीटर जागा हस्तांतरित असतानाही रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वन विभागाने अडवणूक करून साईड पट्टीचे काम बंद पडले आहे. आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वनविभागाची अडवणूक व साडे पाच मीटरपर्यंत सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदार संघ असूनही विकास कामांच्या दर्जाकडे व वन विभागाच्या अडवणूकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री के. सी. पाडवी यांच्याबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com