सात कोटींचा रस्ता तीनच वर्षात मातीमोल; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सात कोटींचा रस्ता तीनच वर्षात मातीमोल. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सात कोटींचा रस्ता तीनच वर्षात मातीमोल; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नंदुरबार : शहादा तालुक्‍यातील डांबरखेडा ते काथर्दे दरम्‍यान असलेल्‍या रस्‍त्‍याचे तीन वर्षांपुर्वी तयार करण्यात आला होता. सात कोटी रूपये खर्चून तयार केलेला रस्‍ता तीनच वर्षात मातीमोल झाला आहे. आता तर या रस्‍तयावरून चालणे देखी मुश्‍कील झाले आहे. (nandurbar-news-dambarkheda-kathrde-road-worth-Rs-7-crore-has-been-demolished-in-just-three-years)

नर्मदा नदीच्या काठावरील सरदार सरोवर प्रकल्पबाधित झालेल्या ७ आदिवासी पाड्यांना शहादा तालुक्यातील डामरखेडा ते काथर्दे या परिसरात पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावांना रहदारीसाठी २०१७-१८ साली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सेंट्रल रोड फंड मधून सात कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या डांबरखेडा ते काथर्दे रस्त्याची पहिल्याच वर्षी दुरवस्था झाली होती.

जिल्‍हा परिषदेकडे काम वर्ग पण

तीन वर्षांनंतरही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी डामरखेडा येथील सरपंच दत्तू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. सदर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील केली. परंतु हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्याने दुरुस्ती जिल्हा परिषद करेल असे सांगण्यात आले. जिल्हा परिषदकडे विचारणा केली असता आम्हाला तसे पत्र दिले नसल्यामुळे आम्ही दुरुस्ती करू शकत नाही; असे उत्तर देण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सात कोटींचा रस्ता तीनच वर्षात मातीमोल; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
इलेक्ट्रॉनिक युगातही ग्रामीण भागात फिरतेय जुन्या काळातील जातं

तर आत्‍मदहन

पावसाळ्यात सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे, तसेच सदर रस्त्यावर बांधण्यात आलेले पूल देखील निकृष्ट दर्जाचे असून त्याला कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वारंवार अपघात होतात. पुढील चार महिन्यांत हा रस्ता दुरुस्त न झाल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com