मक्याच्या शेतात लपविल्या 11 मोटारसायकल; पोलिसांनी केले हस्तगत

मक्याच्या शेतात लपविल्या 11 मोटारसायकल; पोलिसांनी केले हस्तगत
Bike robbery
Bike robbery
Published On

नंदुरबार : नंदुरबार, धुळे आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांकडून 5 लाख 87 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्याची करवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. (nandurbar-news-crime-news-bike-robbery-police-arrested-porson-and-elevan-bike)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, धुळे आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे, धडगाव तालुक्यातुन एका 22 वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन मकाच्या शेतात लपवलेल्या ११ मोटारसायकल हस्तगत केल्या आहे. नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती, यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मासिक गुन्हे बैठकीत याबाबत आढावा घेतला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरी झाल्याबाबतच्या गुन्ह्याची माहिती काढत तपासाची चक्रे फिरवली.

कमी किमतीत विक्री

गुप्त माहितीच्या आधारे धडगाव तालुक्यातील एक इसम कमी किमतीत आणि विना कागदपत्रे असलेली मोटारसायकल विक्री करत होता. या माहितीवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार करून त्याठिकाणी रवाना केले. पथकाने एका 22 वर्षीय देविदास उर्फ बादशहा कैलास राऊत याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने विविध ठिकाणांहुन मोटारसायकल चोरी केल्या असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 5 लाख 87 हजाराच्या 11 मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com