नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यात बघता बघता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात ९ रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर पोलीस (Nandurbar Police) पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पोलीसांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करत विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. (nandurbar news Corona positive patient increased Police administration also in action mode)
कोरोना बाधितांचा (Corona Positive) विस्फोत आता सर्वत्र होत असल्याचा पाहण्यास मिळत आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) देखील आतापर्यंत बाधितांची संख्या कमी होती. ती दोन दिवसांपासून वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे प्रशासन देखील आता अलर्ट झाले आहे.
दंडात्मक कारवाई
पोलीसांनी विनामास्क फिरणाऱया पादचारी आणि वाहन चालक यांच्यावर प्रत्येकी दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई देखील केली आहे. विशेष म्हणजे कारवाईनंतर पोलीसांनी विनामास्क फिरणाऱया नागरीकांना मास्कचे वाटप केले आहे. गेल्या आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित (Nandurbar Corona Update) तरुणांच्या संख्येत वाढ झाल्याने पोलीस आणि प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आल्याने विनामास्क फिरणाऱयांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र देखील दिसुन आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.