Nandurbar News: नर्मदा नदीवरील बोट एम्ब्युलन्सच धोकादायक; तरीही आरोग्य कर्मचारी देताय सेवा

नर्मदा नदीवरील बोट एम्ब्युलन्सच धोकादायक; तरीही आरोग्य कर्मचारी देताय सेवा
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : गेली सतरा वर्षे घसारा झाल्याने नंदुरबारमधील तरंगता दवाखाना अत्यंत धोकादायक बनला आहे. अशाही जीवघेण्या आणि कधीही कुठल्‍याही मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणाऱ्या या तरंगत्या (Nandurbar News) दवाखान्यावरुन अतिशट तुंटपुंज्या अशा सुविधा आणि अंधारात आरोग्य व्यवस्था आपले काम चोख बजावित आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Traffic Rules: वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या अनुशंगाने 2005 मध्ये युरोपीयन कमीशनने दोन तरंगते दवाखाने (Hospital) जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले आहे. हेच तरंगते दवाखाने आता अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या सतरा वर्षात या तरंगते दवाखान्याच्या वापर न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

२०१५ मध्‍ये बुडाली बोट

यातील एक दवाखाना तर २०१५ मध्येच बुडाला असुन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न देखील प्रशासनाने केला नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे तैणात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे. यातील विद्युत व्यवस्था बंद पडल्याने वैद्यकीय पथकाला रात्री अपरात्री रुग्ण आल्यास टॉर्चच्या उजेडात रुग्णांना तपासावे लागत आहे. सतरा वर्षात हे दवाखाने कधी पाण्याबाहेर काढुन त्या खालचे पत्र सडले कि व्यवस्थीत आहे, हे पाहण्याची तसदी देखील आरोग्य यंत्रणेने घेतलीच नाही.

९ गावे अन्‌ ५० हून अधिक पाडे

चिमलखेडी येथे तैणात हा तरंगता दवाखाना जवळपास परिसरातल्या ९ खेडे आणि पन्नासहुन अधिक पाड्यांसाठी कार्यरत आहे. यावरील पथकाने सोमवार ते शनिवारपर्यत मुक्कामाचे एक वेळापत्रक तयार केले असुन त्या अनुरुप प्रत्येक गावाच्या काठावर हा तरंगता दवाखाना पोहचुन आरोग्य सेवा पुरवत आहे. मुळातच यातील अनेक गावांना येण्यासाठी रस्ताच नसल्याने हा दवाखानाच आरोग्यासाठी सर्व काही असल्याचे नागरीक सांगत आहेत.

प्रस्‍ताव दिला परंतु...

माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षात या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करुन त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला. मात्र दुरुस्तीच्या खर्चात नविन अत्याधुनक अशा बोट अंबुलन्स येवु शकत असल्याने या युरोपीयन कमीशनने दिलेल्या दवाखान्याच्या दुरुस्तीचा विचारही आरोग्य विभागाने सोडुन दिल्याचे चित्र आहे. अशातच या धोकादायक झालेल्या तरंगत्या दवाखान्याचा वापर करुन आरोग्य यंत्रणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणार का? असाच प्रश्न निर्माण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com