दोन विसरभोळ्यांची गफलत अन् पोलिसांची तारांबळ

दोन विसरभोळ्यांची गफलत अन् पोलिसांची तारांबळ
Police
Police
Published On

नंदुरबार : शहरातील दोन विसरभोळ्या तरुणांची गफलत झाल्याने दोघांनी एकमेकांच्या मोटारसायकली घेऊन जात नंतर आपली मोटारसायकल नाही हे लक्षात आल्यावर आपली मोटारसायकल चोरीस गेल्याचा भास झाला. त्यांनी पोलिसांना कळविले, पोलिस आले. त्यांनी दोन्ही मोटारसायकली चोरीस गेल्याच्‍या ठिकाणी तपास केला, तर दोघांच्याही मोटारसायकली त्याच ठिकाणी होत्या. मात्र यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

नंदुरबार येथील नीतेश नाथजोगी यांची दुचाकी (एमएच ३९, के २२७७) घेऊन त्यांचे मित्र कोकणी हिल परिसरातील एचडीएफसी बँकेजवळ गेले होते. या वेळी तिथून परतताना त्यांनी दुचाकी तेथेच सोडून नजरचुकीने शेजारी असणारी दुचाकी (एमएच ३९, एए २७२१) घेऊन ते परतले. यामुळे संबंधित दुचाकीस्वारांनी एटीएम बाहेर आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी तत्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधला. या दरम्यान श्री. नाथजोगी यांची दुचाकी (एमएच ३९, के २२७७) कोकणी हिल परिसरातच राहिल्याने दुचाकी चोरीला गेल्याची समजूत करत त्यांनीही तत्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क केला.

Police
जामीनावर सुटताच भावाच्या खुन्याला संपवले

दुचाकी क्रमांक ग्रुपवर टाकून तपास

पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तत्काळ दखल घेऊन दोन्ही दुचाकींचे क्रमांक ग्रुपवर टाकून दोन्ही ठिकाणी पोलिस कर्मचारी रवाना केले. यातील दोन्ही नमूद दुचाकींपैकी (एमएच ३९, के २२७७) कोकणी हिल परिसर, तर (एमएच ३९, के २२७७) तलाठी कॉलनी परिसरात आढळून आली. दोन्ही दुचाकी अवघ्या १५ मिनिटांतच आढळल्याने दोन्ही दुचाकी मालकांचा जिवात जीव आला. पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तत्काळ दखल घेतल्याने दोन्ही दुचाकी परत मिळाल्याने त्यांच्या तत्परतेचे जनसामान्यातून कौतुक करण्यात येत आहे. मात्र यात दोन्ही मोटारसायकलस्वारांच्या गफलतीतून हा प्रकार झाल्याने पोलिसांनी शेवटी कपाळावरच हात मारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com