१७ हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा; अनिल वसावेंची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी

१७ हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा; अनिल वसावेंची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याने पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केली. माउंट सतोपंथ (7075 मी) हे २३ हजार २१२ फूट उंचीचे शिखर सर करत १७ हजार फूट उंचीवर (Nandurbar) तिरंगा फडकवला. (Nandurbar News Mount Satopanth)

Nandurbar News
एक रकमी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कृषी कर्ज देण्यास बँकाचा नकार

सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालूक्यातील 'बालाघाट' या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे याने कोरोना (Corona) काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एलब्रूस' सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता. वसावे यांनी 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस आहे; असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी सांगितले. दरम्यान 23 ऑगस्‍टला हिमालयाच्या गढवाल श्रेणीतील प्रमुख शिखरांपैकी एक आहे. जे भारतीय उपखंडात येते आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील दुसरे सर्वोच्च शिखर माउंट सतोपंथ (7075 मी) हे सर केले.

१० ऑगस्‍टपासून सुरवात

हि मोहिम १० ते ३० ऑगस्ट २०२२ अशी असून हे शिखर सर करण्यासाठी त्यांनी ७ हजार ७५ मीटर म्हणजे जवळजवळ २३ हजार २१२ फूट एवढी उंच असलेल्या माउंट सतोपंथ या शिखरावर खराब हवामान असताना ही सर केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त व अशी विशेष कामगिरी करून आजादी का अमृत मोहिमेस्तव हि मोहीम आखली आहे. विशेष म्हणजे अनिल वसावे पहिल्यांदा एवढा उंच शिखर सर करण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांना प्रचंड मोठी मेहनत करावी लागली.या मोहिमेसाठी नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष भरत गावीत यांनी सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com